पुणे : पुण्याजवळील इंदापूर शहरातील हॉटेल मध्ये जेवणासाठी थांबलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये काल रात्री ही घटना घडली आहे . या घटनेतील खून करण्यात आलेला अविनाश धनवे हा मोक्कामधील आरोपी असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. तो एक महिन्यापूर्वी जेलमधून सुटून आला होता. सोबत जेवायला बसलेल्या मधील मित्रच हल्लेखोरांना सामील असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.
पंढरपूरला जात असताना एका हॉटेलमध्ये तो थांबला असताना त्यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करुन धनवेची हत्या करण्यात आली. यामुळे सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेने महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे. हत्या करणाऱ्यांना कायदा व पोलीस प्रशासनाची भीती राहिली नाही का ? या सगळ्या आरोपींना शिक्षा होईल तसेच नेमकी हत्या कशातून झाली? हे सर्व पोलीस तपासात समोर येईलच पण नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती व असुरक्षितता याला जबाबदार कोण अशा घटना घडू नयेत म्हणून आरोपीना कठोर शिक्षा करायला हवी .
रात्री अपरात्री कुटुंबासोबत जेवताना कुठल्या हॉटेल मध्ये जेवायला थांबावं का ?असा प्रश्न सर्वसामान्याच्या मधून उपस्थित होत आहे. सहजासहजी गुन्हेगारांना बंदुका कशा उपस्थित होतात ? लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर ढासळत असलेली कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चिंताजनक आहे .