3.7 C
New York
Friday, February 7, 2025

Buy now

वंचित बहुजन आघाडी : उदय आणि विकास पुस्तकासाठी आजच नोंदणी करा..!

लोकशाही व्यवस्था कायम राहण्यासाठी सामाजिक चळवळींचा रेटा जसा आवश्यक असतो तसेच राजकीय पक्षांचे अस्तित्व देखील महत्वाचे असते. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या माध्यमातूनच सार्वजनिक हिताचे प्रश्न सोडविता येतात. त्यामुळे जुन्या नव्या पक्षांची सांगड घालून राजकीय व्यवस्था काम करीत असते. कोणत्याही राजकीय पक्षाला वगळून किंवा टाळून संसदीय राजकारण करता येत नाही. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष म्हणूनच आवश्यक असतात.

वंचित बहुजन आघाडी हा देखील असाच एक प्रादेशिक पक्ष 2018 मध्ये जन्माला आला आहे. या पक्षाने 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवून आपली ताकद आजमावली होती. 2024 मध्येही हा पक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरलेला आहे. या पक्षाची निर्मिती, त्या मागची पार्श्वभूमी आणि तिला मिळत असलेला पाठिंबा याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची वंचितसंबंधीची भूमिका समजून घेण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी : उदय आणि विकास असे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. यात 2018 आणि 2019 मधील घटना घडामोडींचा समावेश आहे. वृत्तपत्रांतील लेख, मुलाखती, बातम्या यांचा आधार घेवून वंचितचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला असून, या पुस्तकाचे संपादन वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक धनाजी कांबळे यांनी केले आहे. प्रकाशन 21 एप्रिल 2024 (महावीर जयंती) रोजी ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे.

या पुस्तकाचे स्वागत मूल्य 200 रुपये आहे. मात्र, प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास हे पुस्तक 150 रुपयांना उपलब्ध होणार आहे. (पोस्टेज खर्च 20 रुपये वेगळा)

नोंदणीसाठी संपर्क
आकाश एडके 8180937230
ॲड. गायत्री कांबळे 9767740618
सुमती डोंगरे 9730969362

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या घडामोडी