आंतरराष्ट्रीय : रशियाची राष्ट्राध्यक्षपदी पुतीन हे पाचव्यांदा विराजमान होत आहेत . विरोधक नसल्यामुळे पुन्हा पाचव्यांदा रशियाची सूत्रे पुतीन यांच्या हाती एकवटली आहेत . तेथील नागरिकांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी सक्षम असा पर्याय उपलब्ध नसल्याने पुतीन यांचा विजय होणार हे उघड होते . पुतीन यांनी ८८ % मतांनी ही राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली असून १९९९ पासून रशियामध्ये पुतीन यांचीच सत्ता आहे .
शुक्रवारी सुरु झालेलं मतदान तीन दिवस सुरु होते. त्यानंतर लागलेल्या निकालात पुतिन यांनी विजय मिळवला. पुतिन यांचे कट्टर विरोधक ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात तुरुंगातच मृत्यू झाला आहे तर त्यांचे बाकीचे टीकाकार तुरुंगात आहेत. पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणारे व राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होणाऱ्या पुतीन हे ७१ वर्षाचे आहेत. पुतिन यांच्या विरोधात तिघांनी निवडणूक लढवली यामध्ये क्रेमलिन या एका नावाचा समावेश असून तिघांनीही त्यांच्या २४ वर्षांच्या राजवटीवर किंवा दोन वर्षांपूर्वी युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई सुरू करण्याच्या निर्णयाविरुद्ध भाष्य केले नव्हते .