काँग्रेसच्या वतीने डॉ. प्रकाश आंबेडकर यांना भारत जोडो यात्रेच्या सांगता सभा करिता आमंत्रित केले असून ते त्यांनी स्वीकारले देखील आहे.
शिवाजी पार्क येथे होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेचे आमंत्रण प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले असून ते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट द्वारे दिली आहे. त्याचबरोबर काँग्रेस चे अध्यक्ष मलिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांना देखील जेवणासाठी राजगृहावर बोलविले आहे.
महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांच्यामधील जागा वाटपबाबतचा तिढा सुटला नाही ते या समारोप यात्रेला उपस्थित राहत आहेत ही महत्वाची बाब म्हणावी लागेल. जागा वाटपबाबतचा प्रश्न कदाचित या भेटीतून मार्गी देखील लागू शकतो