मुंबई : सध्याची माध्यम ही समाजातील मूळ प्रश्न मांडत नाहीत त्यामुळे आम्हाला भारत जोडो न्याय यात्रा करावी लागली असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. मुंबई येथील शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या भारत जोडो न्याय यात्रा सांगता समारंभात त्यांनी ही खंत व्यक्त केली .
आज देशात वाढती बेरोजगारी , वाढती महागाई या सारखे गंभीर प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न,अग्निवीर योजने बाबतचा मुद्दा असे असताना देखील माध्यमामध्ये ती दिसत नाहीत .माध्यम व समाज माध्यमे ही सर्व सामान्यांच्या हातात नाहीत असे मत राहुल गांधी यांनी स्पष्ट केले .