3.2 C
New York
Saturday, February 8, 2025

Buy now

महाराष्ट्रात होणार पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक

मुंबई 16 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या असून महाराष्ट्रात यंदा लोकसभेच्या निवडणूका पाच टप्प्यात होणार आहेत.इतिहासात पहिल्यांदाच अशा पाच टप्प्यात महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका होत आहेत.

महाराष्ट्रात यंदा 2024 मध्ये पाच टप्प्यांमध्ये घेण्यात येणारी निवडणूक लोकसभेच्या 48 जागांवर लढवण्यात येत आहे .पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे आणि चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे तर पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे . या मतदानाचे निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.

*सविस्तर निवडणूक तपशील पुढील प्रमाणे

पहिला टप्पा : 19 एप्रिल ला रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा : 26 एप्रिल ला बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ -वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा : 7 मे रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी – सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.

चौथा टप्पा : 13 मे नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा :20 मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या घडामोडी