5.6 C
New York
Friday, February 7, 2025

Buy now

काँग्रेसचे कन्हैयाकुमार जिंकले पाहिजेत….

संजीव चांदोरकर .

कन्हैया कुमार काँग्रेसचे उमेदवार आहेत हा माझ्यासाठी तांत्रिक माहितीचा भाग झाला. ते इतरही अनेक गोष्टींचे प्रतिनिधीत्व करतात.

ते जिंकले पाहिजेत कारण कन्हैय्याकुमार (अनेकवचनी) हे एकविसाव्या शतकातील भारताचे ध्वजधारक (फ्लॅग बेअरर्स) असणार आहेत.
कारण कन्हैयाकुमार यांचा विजय फक्त “दिल्ली”पुरता मर्यादित नसणार आहे .

कारण त्यांचा विजय फक्त जेएनयूचा विद्यार्थी नेता असलेल्या “कन्हैयाकुमार” पुरता मर्यादित विजय नसणार आहे.

कारण त्यांचा विजय फक्त जेएनयूचा विद्यार्थी नेता असलेल्या “कन्हैयाकुमार” पुरता मर्यादित विजय नसणार आहे.

कारण त्याचा विजय फक्त त्यांच्या काँग्रेस पक्षाचा किंवा इंडिया अलायन्सचा विजय नसणार आहे.

त्यांचा विजय असणार आहे, समाजाच्या साधन संपत्तीविहीन, कोणताही शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा नसणाऱ्या देशातील कोट्यवधी कुटुंबात जन्माला येऊन सक्रिय राजकारणात येऊ पाहणाऱ्या लाखो तरुण तरुणींचा!

त्यांचा विजय असणार आहे अभ्यास, संवेदनशीलता, मेहनत, वक्तृत्व, नेतृत्व या गुणांचा!

त्यांचा विजय असणार आहे, एका इंद्रधनुषी राजकीय आघाडीचा जी देश एकरंगी करायला निघालेल्या राजकीय शक्तींशी राजकीय लढाई लढत आहे.

त्यांचा विजय असणार आहे, देशातील लेफ्ट ऑफ सेंटर राजकीय शक्तींचा, ज्यांना पुन्हा एकदा ताकद मिळण्याची अत्यंतिक गरज आहे.

त्यांचा विजय असणार आहे पराजय धर्म / जाती / व अस्मितांचे संकुचित राजकारण करणाऱ्यांचा.

त्यांचा विजय असणार आहे पराजय येथील धनदांडग्यांचा ज्यांनी राजकीय पदे आपली मुले, नातवंडे, पतवंड्यापुरत्या अडवून धरणाऱ्यांचा.

त्यांचा विजय असणार आहे पराजय मक्तेदार / कॉर्पोरेट भांडवलाचा ज्यांनी सारी अर्थव्यवस्था राबवण्याचे डील केले आहे.

एकविसावे शतक असणार आहे तरुणाईचे !
आणि भारतातील सारे कन्हैय्याकुमार (अनेकवचनी) हे एकविसाव्या शतकातील भारताचे ध्वजधारक (फ्लॅग बेअरर्स) असणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या घडामोडी