नवी दिल्ली : माध्यमे विरोधी पक्षाची भूमिका बजावू शकत नाहीत अस वक्तव्य इंडिया टूडे व आज तक समूहाच्या कल्ली पुरी यांनी केले आहे. इंडिया टुडे ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉन्क्लेव्ह समारोपामध्ये त्या बोलत होत्या. तसेच त्यांनी मुख्य भाषणासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
माध्यमे विरोधी पक्षाची भूमिका बजावू शकत नाहीत अशी अपेक्षा ठेवल्याने गोदी किंवा मोदी मीडिया असे अन्यायकारक आरोप होतात. विरोधी पक्षाची कोंडी होत असेल तर त्यासाठी माध्यमांना दोष देता येणार नाही. आम्ही या बॉक्सिंग सामन्याचे निरीक्षक आहोत,आम्ही खेळाडू नाही असे देखील त्यांनी सांगितले .
कल्ली पुरी या इंडिया टुडे ग्रुपच्या उपाध्यक्ष व कार्यकारी संपादक आहेत. इंडिया टुडे ग्रुपच्यावतीने कॉन्क्लेव्ह २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधानांचे आभार देखील मानले .