अहमदनगर : अरविंद केजरीवाल हे त्यांच्या कर्माने जेल मध्ये गेले असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. अण्णा हजारे यांना अरविंद केजरीवाल यांचे गुरु मानले जाते एकेकाळी आण्णा हजारेंसोबत अरविंद केजरीवाल यांनी आंदोलने केली आहेत . त्यानंतर त्यांनी आप या पक्षाची स्थापना केली .
कथित दारू घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना काल इडी ने अटक केली आहे . हे वृत्त जेव्हा अण्णा हजारे यांना समजल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे . अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार व दारूबंदी विरोधात आंदोलने केली तेव्हा केजरीवाल त्यांच्यासोबत या आंदोलनात सहभागही झाले होते या आंदोलनानंतर केजरीवाल हे खरे प्रकाशझोतात आले होते. जेव्हा केजरीवाल यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेत आप पक्षाची स्थापना केली त्यांचा हा निर्णय आण्णा हजारे यांना पटला नव्हता त्यांच्यामध्ये झालेल्या मतभेदातून अण्णा हजारे हे केजरीवाल यांच्या पासून दूर गेले .