दिल्ली : राज ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे . या भेटीमुळे राज ठाकरे हे महा युतीत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे . राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली . या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नसले तरी ऐन निवडणुका जाहीर झाल्यानंतर घेतलेली ही भेट म्हणजे मनसे महा युती सोबत जाण्याचे संकेत तर नसावेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज ठाकरे व अमित शहा यांच्या झालेल्या भेटीमध्ये मनसेला बरोबर घेण्याची चर्चा झाल्याचं समजतं आहे. मात्र बैठकीचा तपशील मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे . राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते . याची घोषणा मुंबईत होऊ शकते . राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार मनसे कडून चार जागांची मागणी केल्याचे समजते तर भाजप एक जागा देवू शकते अशी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते.