3.7 C
New York
Friday, February 7, 2025

Buy now

तलाठी भरती परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी : प्राची ताकतोडे

सातारा | तलाठी भरती परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने च्या वतीने प्राची ताकतोडे यांनी केले आहे. तलाठी परीक्षेत 200 पैकी 214 गुण एका विद्यार्थिनीस मिळाल्याचे आढळून आल्यानंतर सातारा शहरांमध्ये काँग्रेस च्या वतीने घोटाळ्याची सखोल चौकशी करिता आंदोलन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

युवक हा राष्ट्राचा कणा असतो हे सत्य नाही तर केवळ घोषणेची वाक्य आहे असा समज करून घेऊन महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस-अजित पवार सरकार काम करते आहे. युवकांच्या भविष्याशी खेळून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार जाणीवपूर्वक सुरू असून हे असे चालत राहिल्यास महाराष्ट्राचे वाटोळे झाल्या वाचून राहणार नाही. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला

तलाठी भरती परीक्षा तसेच सर्व स्पर्धा परीक्षा या एम.पी.एस.सी मार्फत घेण्यात याव्यात अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या भविष्यांशी मांडलेला खेळ ताबडतोब थांबवण्यात यावा अन्यथा युवक काँग्रेस याही पेक्षा अधिक तीव्र आंदोलन करेल. असा इशारा देखील काँग्रेसच्या वतीने देत जोरदार निदर्शने सातारा शहरामध्ये करण्यात आली.

यावेळी सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अमरजित कांबळे,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान खान,प्रदेश सरचिटणीस जयदीप शिंदे, प्रदेश सरचिटणीस तारिक बागवान, व जिल्हा प्रभारी अमोल दौडकर, उपाध्यक्ष अमित जाधव, प्रदेश सचिव प्राची ताकतोडे, अमोल शिंदे, नरेंद्र पाटणकर,भूषण देशमुख,देवदास माने,शहानुर देसाई,अरबाज शेख उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या घडामोडी