नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आणि ईडीकडून अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत ईडीने उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांची जंत्री आम आदमी पक्षाने सादर केली आहे. ईडीने आज न्यायालयामध्ये अरविंद केजरीवाल हे जामीन मिळवण्यासाठी मुद्दाम आपल्या रक्तातील साखर वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आणि ते साखरेचे पदार्थ आणि केळी वगैरे सारखे गोड पदार्थ खात असल्याचा आरोप केला होता. या आरोपातील खोटेपणा सिद्ध करून दाखवताना आपच्या नेत्या आतिशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ईडीच्या आरोपातील हवा काढून घेतली.
आम आदमी पक्षाने उपस्थित केलेले मुद्दे :
१. अरविंद केजरीवाल जी मिठाई खातात किंवा ज्या साखरेचा चहा पितात ती साखर म्हणजे डॉक्टरांनी खास लिहून दिलेले Erythritol नावाचं स्वीटनर आहे.
२. अरविंद केजरीवाल केळी खातात हा आरोपही धादांत खोटा आहे. सर्व डॉक्टर्स ज्यांना डायबिटीस आहे त्यांना आपल्या जवळ दोन केळी आणि एक गोड पदार्थ ठेवायला सांगतात.
३. अरविंद केजरीवाल आपली शुगर लेवल वाढवण्यासाठी रोज पुरी भाजी खात असल्याचा आरोपींनी केला होता. मात्र त्यांनी एकच दिवस म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रसाद म्हणून पुरी भाजी खाल्ली होती. त्याआधी किंवा त्यानंतर कधीही खाल्ली नाही. आता भारतीय जनता पक्ष आणि ईडी अरविंद केजरीवाल यांना एकच दिवस प्रसाद खाण्यापासूनही रोखणार का?
४. एक फेब्रुवारीपासून केजरीवाल यांनी एक इन्शुरन्स रिवर्सल प्रोग्रामएका विशिष्ट डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली चालू केला होता. परंतु, जेलमध्ये गेल्यापासून तो प्रोग्राम बंद आहे. त्याचमुळे अरविंद केजरीवाल्यांची साखर ३०० पेक्षा जास्त वाढली आहे.
५. या प्रोग्राम संदर्भात डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याची परवानगी जेल ऑथॉरिटी मागितली होती ती नाकारण्यात आली.
६. रक्तातील साखर वाढल्याने इन्शुलीन देण्याची मागणी केजरीवाल यांनी केली होती ती जेल प्रशासनाने मान्य केलेली नाही.
७. एकदा घरचं जेवण बंद केलं की केजरीवाल यांना जेल प्रशासन कधी जेवण देतं? काय जेवण देतं याच्यावर नियंत्रण राहणार नाही आणि अरविंद केजरीवाल यांच्या तब्येतीचे काहीही होऊ शकत.
८. अरविंद केजरीवाल यांच्यावर खोटे आरोप करून त्यांचे घरचे जेवणं बंद करण्याचा ईडी आणि भाजपाचा डाव असून भारतीय जनता पक्ष आणि ईडी अरविंद केजरीवाल यांच्या जीवावर उठले आहे .