दिल्ली : भ्रष्टाचार विरोधी लढाई चालूच राहील असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ANI या न्यूज एजन्सी ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सुमारे एक तास वीस मिनटे चाललेल्या या मुलाखतीमध्ये त्यांनी भ्रष्टाचारामुळे देश बरबाद झाला असून भ्रष्टाचार खपवून घेणार नाही तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध आपण पूर्ण ताकदीनिशी लढत राहू असे स्पष्ट केले .
पारदर्शकता ए.व्ही.एम . इडी, सीबीआय , निवडणूक आयोग या संदर्भात बोलताना पंतप्रधानांनी इडीने केलेल्या कारवाई मध्ये एकूण कारवाई पैकी फक्त 3 % च राजनीतीमधील लोकांचा समावेश असल्याचे स्पष्ट केले . त्याचबरोबर इलेक्ट्रोल बाँडमुळे राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या देणग्या मध्ये पारदर्शकता आल्याचे त्यांनी सांगितले . इडी , सीबीआय, निवडणूक आयोग हे सर्व भाजपच्या दबावाखाली आहेत त्यामुळे निवडणूक पारदर्शक होवू शकत नाही या विरोधकांच्या आरोपाबाबत विचारले असता इडी ही एक स्वतंत्र संस्था असून नाचता येईना अंगण वाकडे अशी विरोधकांची स्थिती असल्याची टीका त्यांनी केली .