दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अटक केली आहे. याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रकरणात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना सक्तीच्या कारवाईपासून संरक्षण देण्याची विनंती करणारी याचिका फेटाळली होती.
यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानाची झडती घेण्यास सुरुवात केली. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात आतापर्यंत त्यांना जारी केलेले जवळपास नऊ ईडी समन्स वगळले आहेत.
या प्रकरणी समन्स बजावण्यासाठी ईडीचे अधिकारी अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. वृत्तानुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी केजरीवाल यांच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्याकडे सर्च वॉरंट असल्याची माहिती दिली.