मुंबई : शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या भारत जोडो न्याय यात्रा सांगता समारंभात उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला देशाच नाव बदलायचं आहे का ? असा प्रश्न भाजपला उपस्थित केला. मी नेहमी सांगतो माझा देश हाच माझा धर्म आहे आणि आपला हा देश वाचला तर आपण वाचू. आपला देश हीच आपली किंवा एखाद्या व्यक्तीची ओळख पाहिजे. एका व्यक्तीवरून देशाची ओळख होता कामा नये. कोणी कितीही मोठा असला तरी माझा देश त्याच्यापेक्षा मोठा आहे. आपण म्हणतो हा माझा देश आहे, या देशाच्या सरकारला भारत सरकार म्हणतो. परंतु ते लोक मोदी सरकार, मोदी सरकार अशी जाहिरात करता. तुमच्या डोक्यात माझ्या देशाचं नाव बदलायचं आहे का? भारत हे माझ्या देशाचं नाव आहे आणि आम्ही ते कोणालाही बदलू देणार नाही. असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट सुनावले .
ही लढाई संविधान वाचवायची आहे. संविधान वाचले तर देश वाचेल परंतू यांना संविधानच बदलायचे आहे. यांना 400 पार याच कारणासाठी हवे आहे. त्यांचे मंत्री आनंद कुमार हेगडे म्हणाले, आम्हाला संविधान बदलायचे आहे. त्यासाठी 400 पार हवे आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची उपमा देखील त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली .