नवी दिल्ली : इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये आज पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते त्यावेळी इंडिया टूडे व आज तक उद्योग समूहाचे अरुण पुरी यांनी पंतप्रधानांना तुम्ही २०२९ च्या निवडणुकीची तयारी करत आहात का ? असा प्रश्न विचारला तेव्हा “आप २०२९ पे रुक गए , मै २०४७ की तैयारी कर रहा हूँ ” अस उत्तर दिले .
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच आगामी निवडणुकीबाबत भाष्य केले. मोदी काय आहेत हे शोधण्यासाठी तुमची संपूर्ण टीम पणाला लावा. तुम्ही २०२९ ला अडकलात, मी तर २०४७ ची तयारी करत आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी २०२४ नंतरच्या निवडणुकांबाबतही सकारात्मक भाष्य करून पुढेही तेच भाजपाचंच सरकार सत्तेत राहणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. आजच लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असताना त्यांनी केलेले वक्तव्य महत्वाचे आहे.